बुलडाणा - नांदुरा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उभारलेल्या कोविड रुग्णालयात रुग्णांना देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये अळ्या आढळल्या आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
नांदुरा कोविड रुग्णालयातील रुग्णांच्या नाश्त्यात आढळल्या अळ्या
एका गावच्या सरपंचाचे पती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी नांदुरा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांना देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये अळ्या आढळल्या. त्यांनी या अळ्या असलेल्या नाश्त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
एका गावच्या सरपंचाचे पती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी नांदुरा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांना देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. त्त्यांनी या अळ्या असलेल्या नाश्त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ही बाब तहसिलदार राहुल तायडे यांना समजताच त्यांनी रुग्णाची भेट घेतली. या घटनेची माहिती पत्रकारांना देऊन व्हायरल केल्याबद्दल तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू, तुम्ही इथून निघून जा, अकोला येथे उपचारासाठी दाखल व्हा, अशा धमक्या दिल्याचा आरोप रुग्णाने केला आहे.
कालच हिंगोलीतील शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्येही अळ्या निघाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरात असलेल्या 'ओम साई सर्व्हिसेस'च्या गोदामावर छापा मारला. राज्यात अनेक ठिकाणच्या कोरोना सेंटरमधून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रारी समोर येत आहेत.