बुलडाणा - जिल्ह्यातील कामगार कार्यालयात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनील उत्तर देणे टाळले. एवढेच नाही तर ईटीव्ही भारतच्या पत्रकाराला कॅमेरा बंद करायला सांगून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. ही घटना आज(15 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली.
कामगारांच्या गैरसोयीबद्दलचा प्रश्न विचारताच कामगार मंत्री कुटेंनी घेतला काढता पाय - कामगार मंत्री डॉ. संजय कूटे
जिल्ह्यातील कामगार कार्यालयात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी ईटीव्ही भारतच्या पत्रकाराला कॅमेरा बंद करायला सांगून तिथून काढता पाय घेतला. ही घटना आज(15 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली.
कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच कामगार मंत्री डॉ.कूटे भडकले
शासनाच्या कामगार खात्यामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार नोंदणी करणे आवश्यक असल्याने शेकडो कामगार सरकारी कार्यलयात येतात. या प्रक्रियेत कामगारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे, नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करण्याविषयी कुटे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, कुटे यांनी कॅमेरा बंद करायला सांगून उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला.
Last Updated : Aug 15, 2019, 11:44 PM IST