बुलडाणा- शेतात बोअरवेलचे काम करून थकल्याने विश्रांती म्हणून बोअरवेलच्या गाडीखालीच झोपी गेलेल्या छत्तीसगढ येथील एका 28 वर्षी मजूराचा चाकाखाली चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुधा शिवारात शुक्रवारी 23 एप्रिल रोजी घडली आहे. शिवभोज बसपती बैयगा (वय २८ रा. चरखी, ता. देवसर, जि. सिंगरोली, छत्तीसगढ) असे
मृताचे नाव आहे.
बोअरवेल वाहनाच्या चाकाखाली चिरडल्याने मजुराचा मृत्यू - मजुराचा चिरडून मृत्यू
बुलडाणा तालुक्यातील दुधा शिवारात गणेश कड यांच्या शेतात शुक्रवारी बोअरवेल करण्याचे काम सुरू होते. काम करून थकलेला शिवभोज बसपती बैयगा बोअरवेलच्या ट्रकच्या चाकाखाली सावलीच्या आधाराने गाढ झोपी गेला होता. दुपारी ३. ३० वाजताच्या दरम्यान चालकाच्या अनभिज्ञतेमुळे ट्रक रिव्हर्स घेतला गेल्याने ट्रकचे चाक शिवभोज बैयगा यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
चालकाच्या अनभिज्ञतेमुळे ट्रक रिव्हर्स घेतल्याने झाली घटना-
बुलडाणा तालुक्यातील दुधा शिवारात गणेश कड यांच्या शेतात शुक्रवारी बोअरवेल करण्याचे काम सुरू होते. काम करून थकलेला शिवभोज बसपती बैयगा बोअरवेलच्या ट्रकच्या चाकाखाली सावलीच्या आधाराने गाढ झोपी गेला होता. दुपारी ३. ३० वाजताच्या दरम्यान चालकाच्या अनभिज्ञतेमुळे ट्रक रिव्हर्स घेतला गेल्याने ट्रकचे चाक शिवभोज बैयगा यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. या दूर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.