बुलडाणा- 'गोविंदा रे गोपाळा', 'मच गया शोर सारी नगरी मे' अशा गाण्यांच्या तालांवर खामगावात शनिवारी चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला साजरा करण्यात आला. बालाजी गणेश उत्सव मंडळ व आनंद राणा मित्रमंडळातर्फे केलेली सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गोविंदा रे गोपाळा : खामगावात 'गोकुळाष्टमी' उत्साहात साजरी - गोविंदा रे गोपाळा
बुलडाणा जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उल्हासात साजरा करण्यात आला.
खामगावात 'गोकुळाष्टमी' उत्साहात साजरी
दहीहंडीला पाण्याचे शॉवर, इंदौर लायटिंग, बलून असे आकर्षण करण्यात आले होते. ठिक-ठिकाणी शिक्षकांच्या मदतीने बालगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. जन्माष्टमीनिमित्त ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा'च्या जयघोषाने परिसर दुमदुमन निघाला होता.