महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज जोडणी कापायला कुणीही आले तर फक्त कळवा; नागरिकांना रविकांत तुपकरांचे आवाहन - बुलडाणा वीज जोडणी बातमी

कुणीही विज कनेक्शन कापायला अधिकारी-कर्मचारी आले तर 'स्वाभिमानी'च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा. जे कर्मचारी कनेक्शन कट करण्यासाठी येतील 'त्या' कर्मचारी-अधिकाऱ्यास 'स्वाभिमानी' स्टाईलने धडा शिकवू असा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी यांनी महावितरणला दिला आहे.

buldhana
वीज जोडणी

By

Published : Mar 6, 2021, 4:39 PM IST

बुलडाणा:- कुणीही विज कनेक्शन कापायला अधिकारी-कर्मचारी आले तर 'स्वाभिमानी'च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा. जे कर्मचारी कनेक्शन कट करण्यासाठी येतील 'त्या' कर्मचारी-अधिकाऱ्यास 'स्वाभिमानी' स्टाईलने धडा शिकवू असा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी यांनी महावितरणला दिला आहे. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बुलडाणा महावितरणचे अधिक्षक अभियंता दिपक देवहाते यांची भेट घेवून त्यांना शेवटचा अल्टीमेटम दिला. या काळात कोणत्याही ग्राहकाचे विज कनेक्शन कापाल तर याद राखा,संघर्ष अटळ आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना फटके बसतील,असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले. महावितरणने सध्या विज कनेक्शन कापायचा सपाट लावला आहे. लॉकडाऊन काळातील विजबील माफ करायचे सोडून सध्या जबरदस्ती वसुली सुरू आहे. उर्जामंत्र्यांनी पहिले विजबिल माफीचे सूतोवाच केले व नंतर घूमजाव केला आणि सध्या जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन आहे. विजबिले भरणार कशी? तरीही आता जबरदस्ती बिलांची वसुली सुरू आहे. हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही.असे रविकांत तुपकरांनी सुतवाच करून वीज कापण्यासाठी आलेल्या संदर्भात काळविण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज कनेक्शन कट करू नयेत अशा सुचना अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details