महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाने जिजाऊ जन्मोत्सव सोहळा रद्द; आरोग्यमंत्र्यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत केली. त्यामुळे टोपे यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाने दिली.

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

By

Published : Jan 4, 2021, 4:53 PM IST

Updated : Jan 4, 2021, 5:35 PM IST

बुलडाणा - मराठा सेवा संघाच्यावतीने 12 जानेवारीला दरवर्षी आयोजित करण्यात होणारा 'माँ जिजाऊ जन्मोत्सव' सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. हा जन्मोत्सव सोहळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून उत्कृष्ट काम करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मराठा सेवा संघाच्यावतीने 'मराठा विश्वभूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कोरोनाने जिजाऊ जन्मोत्सव सोहळा रद्द

राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाडामध्ये दरवर्षी 12 जानेवारीला जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यामध्ये दाखल होतात. तसेच मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म व्यासपीठावर वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध प्रकारचे बुक स्टॉल व जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे


हेही वाचा-'केंद्र सरकारने गरिबांसाठीही कोरोनावरील लस मोफत द्यावी'

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठा सेवा संघाच्यावतीने मराठा विश्वभूषण पुरस्कार-

मराठा सेवा संघाच्यावतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो. परंतु या वर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचा संकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा भव्य स्वरूपात करण्यात आला नाही. हा सोहळा अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत केली. त्यामुळे टोपे यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती लोखंडे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्यमंत्र्यांच्या आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अशावेळीही आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या लढ्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेणे व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता.

Last Updated : Jan 4, 2021, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details