बुलडाणा - पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या नितीन राठोड यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्ह्यातील चोरपांग्रा येथे हा विधी करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद येथे व त्यानंतर ते त्यांच्या गावी चोरपांग्रा येथे आणण्यात येणार आहे.
बुलडाणा : शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार - Martyr
बुलडाणा जिल्ह्यातील चोरपांग्रा येथील जवान नितीन राठोड हे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थीव औरंगाबाद येथून चोरपांग्राकडे रवाना करण्यात आले आहे. त्यांच्या पार्थीवावर चोरपांग्रा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
![बुलडाणा : शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2464203-327-b8e06572-dcf2-4e0b-bfda-fd8596cbf5c3.jpg)
नितीन राठोड
कुटुंबाची परिस्थिती नसताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीन सैन्यात भर्ती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी, असे कुटुंब आहे.