बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात बुलडाण्यात गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून 'इस्लामिक गाईडन्स सेंटर'कडून एका महिण्याच्या गृहउपयोगी रेशनची किटचे मोफत वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून आत्तापर्यंत 300 च्या वर रेशन किटचे गरजवंतांना वितरण करण्यात आले आहे. कोरोनाला अफवा न समजता या आजारापासून वाचण्याकरता घरातच राहण्याचे आवाहनही 'ईस्लामिक गाईडन्स सेंटर'चे उमर देशमुख यांनी केले आहे.
ईस्लामिक गाईडन्स सेंटरकडून गरजुंना मदतीचा हात, गृहउपयोगी रेशन किटचे वाटप - गरीबांना गृहउपयोगी रेशनची किट वाटप
लॉकडाऊनच्या काळात गरीबांना काही प्रमाणात मदत मिळावी म्हणून बुलडाण्यात इस्लामिक गाईडन्स सेंटरच्या खाली काही युवक एकवटले आहेत. हे युवक आपल्या जवळील रक्कम जमा करून तथा मिळत असलेल्या देणगीच्या माध्यमातून गरिबांसाठी एक महीना पुरेल एवढे रेशन किट तयार करुन वाटप करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात गरीबांना काही प्रमाणात मदत मिळावी म्हणून बुलडाण्यात इस्लामिक गाईडन्स सेंटरच्या खाली काही युवक एकवटले आहेत. हे युवक आपल्या जवळील रक्कम जमा करून तथा मिळत असलेल्या देणगीच्या माध्यमातून गरिबांसाठी एक महीना पुरेल एवढे रेशन किट तयार करत आहे. त्यामध्ये पीठ, तेल, डाळ, तांदूळ, साखर यांच्यासह इतर गृहोपयोगी वस्तू आहेत.
गोरगरीब, भटके, गरजू, अशा अशा कुटुंबांना शोधून-शोधून त्यांना घरपोच ते तयार रेशन किट पोहचवत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत इस्लामिक गाईडन्स सेंटरमार्फत 300 परिवाराला किट पोहचविण्यात येत आहे. जोपर्यंत लॉकडाऊन असेल, तोपर्यंत अशाच प्रकारे किटची आवश्यकता असणाऱ्या परिवारांना किटचे वितरण करत राहणार असल्याचे प्रतिक्रिया इस्लामिक गाईडन्स सेंटरचे उमर देशमुख यांनी दिली.