बुलडाणा - शहरामधील साफ - सफाई करण्याकरिता 2 कोटी 40 लाख रुपयांच्या देण्यात येणाऱ्या ऑनलाइन कंत्राटात अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. बुलडाणा नगरपरिषदेत ऑनलाइन निविदा प्रक्रियेमध्ये अनियमियता झाल्याची तक्रार करत, मागासवर्गीय संस्थेवर अन्याय करणाऱ्या बुलडाणा नगर परिषदेच्या निविदा उघडणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते धिरज अवसरमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांजवळ तक्रार केली आहे. तर या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्यधिकारी महेश वाघमोडे यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
शहराच्या साफ-सफाई कंत्राटात अपहार, मागासवर्गीय संस्थेला डावलल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - irregularities in City council buldana
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अकोला यांच्या मान्यतेने बुलडाणा शहर साफ - सफाई करण्याकरिता, 1 वर्षासाठी 2 कोटी 40 लक्ष रुपयांची निविदा मागवण्यात आली होती. बुलडाणा नगर परिषदेत चारवेळा अनुक्रमे 29 जुन, 11 जुलै, 19 जुलै आणि 30 जुलैला ऑनलाईन पद्घतीने निविदा मागविण्यात आली. या प्रक्रियेत पात्र असलेल्या संस्थेला डावलून अपात्र संस्थेला कंत्राट दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अकोला यांच्या मान्यतेने बुलडाणा शहर साफ - सफाई करण्याकरिता, 1 वर्षासाठी 2 कोटी 40 लक्ष रुपयांची निवीदा मागवण्यात आली होती. बुलडाणा नगर परिषदेत चारवेळा अनुक्रमे 29 जुन, 11 जुलै, 19 जुलै आणि 30 जुलैला ऑनलाईन पद्घतीने निविदा मागविण्यात आली. 29 जुन व 11 जुलै रोजी नियमानुसार निविदेत कंत्राटदार न आल्याने आणि 19 जुलैला निविदेत कंत्राटदाराच्या तक्रारी असल्याचे कारण पुढे करत, निविदा रद्द करण्यात आली. तर चौथ्यांदा 30 जुलैला मागवण्यात आलेल्या ऑनलाईन निविदा 1 ऑगस्ट रोजी उघडण्यात आल्या. त्यामध्ये श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली आणि प्रगती मल्टिसर्व्हिसेस गंगापूर या कंत्राटदारांनी भाग घेतला होता.
मागासवर्गीयांच्या मतांवर सत्तास्थापन करणारे सत्ताधारी मागासवर्गीयांच्याच जिवावर उठले - दत्ता काकास
दलित वस्तीचा निधी दुसरीकडे वर्ग केला जात होता. मात्र काँग्रेस आमदार हर्षवर्षन सपकाळ यांनी संसदेत आवाज उठवला आणि त्याला स्थगिती मिळाली. दलित वस्तीतील कामाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून याबाबतीत देखील गौडबंगाल समोर येईल. तसेत ज्या मागासवर्गीयांच्या मतावर सत्ता स्थापन केली. तेच सत्ताधारी मागासवर्गीयांच्या जिवावार उठले असल्याची टीका, नगराध्यक्ष व काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता काकास यांनी केली आहे. तर बुलडाणा शहरातील हायवे रस्त्याकडील पूर्व-पश्चीम भाग दोन नगरसेवकांनी वाटून टाकला आहे आणि हे कंत्राट दोन्ही नगरसेवकांचे असून बुलडाणा नगर पालिकेत निघनारे प्रत्येक कंत्राट हे नगरसेवकच घेत असल्याचा खुलासा दत्ता काकस यांनी केला आहे.