महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंतराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉलपटू जावेद चौधरीकडून लोणार कोविड सेंटरला 2 प्राणवायु संयंत्र भेट - बुलडाणा कोरोना

लडाणा जिल्ह्यातील लोणार येथील आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बॉस्केटबॉलपटू जावेद चौधरी यांनी शुक्रवारी (21 मे) लोणार कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या दोन मशीन भेट देण्यात आल्या.

oxygen machines donated
oxygen machines donated

By

Published : May 22, 2021, 8:05 PM IST

Updated : May 22, 2021, 8:16 PM IST

बुलडाणा -कोरोनामुळे सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती, मात्र आता जिल्हा सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी बरेच मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बॉस्केटबॉलपटू जावेद चौधरी यांच्याकडून शुक्रवारी (21 मे) लोणार कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या दोन मशीन भेट देण्यात आल्या.

जावेद चौधरीकडून लोणार कोविड सेंटरला 2 प्राणवायु संयंत्र भेट
आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बास्केटबॉलपटू जावेद चौधरींनी जपले सामाजिक भान -विविध रियालिटी शो मध्ये झळकलेले व अपघातात पाय गमावलेले दिव्यांग आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बास्केटबॉल पटु जावेद चौधरी यांनी सामाजिक भान जपत आपण राहत असलेल्या शहरासाठी काहीतरी सामाजिक योगदान द्यावे, या भावनेने त्यांनी लोणार कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या दोन मशीन भेट दिल्या. शुक्रवारी तहसीलदार सैफन नदाफ यांच्या उपस्थित कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापक डॉ भास्कर मापारी यांच्याकडे त्यांनी या मशीन सुपूर्द केल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक फिरोजशाह, जावेद चौधरी, डॉ. पुजा सरकटे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
Last Updated : May 22, 2021, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details