बुलडाणा -विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यालाही उन्हाच्या झळा पोहचत आहेत. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. तापमानाचा पारा हा ४३ अंशावर पोहोचला आहे. यामुळे बुलडाणेकरांनी कधीही न अनुभवलेले तापमान यावर्षी पाहायला मिळत आहे.
मागीत ३ ते ४ वर्षापासून जिल्ह्यात अत्यल्प पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्याचा फटका आता नागरिकांना बसत आहे. २८ एप्रिलला तापमानाने ४३ अंशाचा पारा पार केला आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेला बुलडाणा जिल्हाही तापला, पारा ४३ अंशांवर वाढत्या तापमानामुळे बुलडाण्यातील बाजारपेठेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. उन्हापासून स्वतःचा बचाव करत नागरिक रुमाल चष्मे याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. तर, थंड पेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामूळे स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांनी केले आहे. भरपूर प्रमाणत पाणी प्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रुमाल, टोपीचा उपयोग करा. शक्यतोवर उन्हामध्ये बाहेर पडु नका, असे त्यांनी म्हटले आहे.