बुलडाणा -संतनगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरूषांचे भव्य पुतळे बसविल्यानंतर, शहराच्या सौंदर्यात भर पडली असून हे पुतळे तरुणाईकरता प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत माजी कामगार मंत्री व आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केले. शहरामध्ये कुटे यांच्या हस्ते पुतळ्यांचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
बुलडाण्यात शिवाजी महाराजांसह आंबेडकर पुतळ्याचे अनावरन; आमदार कुटेंच्या उपस्थितीत कार्यक्रम हेही वाचा -
शिवजयंतीचे औचित्य साधून नगराध्यक्षा शकुंतला बुच आणि आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला. यापूर्वी नागरिकांच्या मागणीवरुन नगरपालिकेमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करुन तत्कालीन मुख्याधिकारी व माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल यांनी पुतळ्यासाठी प्रत्येकी 21 लक्ष रुपयांचा ठराव मंजूर केला होता.
हेही वाचा -