महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिसर्‍या लाटेत महाराष्ट्रात 50 लाख नागरिक आणि 5 लाख बालके संक्रमित होतील - डॉ. राजेंद्र शिंगणे - Dr. Rajendra Shingane

कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. तिसरी लाट आली तर राज्यात 50 लाख नागरिक संक्रमित होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. या लाटेत जवळपास 5 लाख बालकांचा समावेश असेल असा अंदाज डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला आहे.

अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे
अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

By

Published : Jun 25, 2021, 10:24 PM IST

बुलडाणा - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. तिसरी लाट आली तर राज्यात 50 लाख नागरिक संक्रमित होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. या लाटेत जवळपास 5 लाख बालकांचा समावेश असेल, असा अंदाज अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला आहे. आज शुक्रवारी बुलडाण्यात ते आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबात घेण्याच्या उपाययोजनेबाबत माहिती देताना अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

'मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संबंधित विभागाला सुचना'

दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने तिसरी लाट येण्याबाबतची चर्चा झाली. तसेच, या लाटेवर नियंत्रण कसे करायचे या संदर्भात चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या लाटेमध्ये जवळपास 50 लाख रुग्ण संक्रमित होतील, तर त्यातील पाच लाख रुग्ण हे बालक असल्याचा अंदाज शिंगणे यांनी व्यक्त केला आहे.

'तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज'

सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी प्रशासनाला तयारीत राहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये कोरोनाची तिसरी लाट राज्यामध्ये आली, तर राज्याने कशा पद्धतीने तिच्यावर नियंत्रण मिळवायचे याची चर्चा करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तज्ञांच्या अंदाजानुसार 5 लाख बालके संक्रमित होण्याची शक्यता आहे. यामध्ये जवळपास अडीच टक्के बालके शासकीय आरोग्य सुविधांमध्ये दाखल होतील. साडेतीन टक्के बालके रुग्णालयात दाखल होतील. त्यांच्यावर बालरोग तज्ञांकडून उपचार करण्याची गरज आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला ज्या काही अडचणी आल्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची अडचण, काही ठिकाणी डॉक्टरांची तर काही ठिकाणी रेमडीसीवीरची अडचण आली. या सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीत झाली. दरम्यान, मला पूर्ण खात्री आहे या तिसऱ्या लाटेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ, असा विश्वासही शिंगणे यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details