बुलडाणा - केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. 19 हजार कोविड लसीचा पहिलासाठा बुधवारी 13 जानेवारीच्या रात्री बुलडाण्यात दाखल झाला आहे.
बुलडाण्यातील 7 सामान्य रुग्णालयांत व्यवस्था
केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. 19 हजार कोविड लसीचा पहिला साठा बुलडाण्यात दाखल झाला आहे. बुलडाणा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या विशेष वाहनाने ही लस अकोल्याहून बुलडाण्यात आणण्यात आली आहे. बुलडाण्यातील जिल्हा परिषदेतील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवण्यात आली आहे. बुलडाण्यातील 7 सामान्य रुग्णालयांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात शेगांव, खामगांव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, देऊळगांवराजा, मेहकर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस पोहोचवली जाणार आहे. तसेच 16 जानेवारीला ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे यांनी दिली आहे.
दुसरा डोस 28 दिवसांनी
जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची चोख व्यवस्था केली आहे. यापूर्वी ड्राय रन यशस्वी करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राममूर्ती यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आणि त्यांचे सहकारी लसीकरणासाठी सज्ज आहेत. यापूर्वी दहा ठिकाणी लसीकरण होणार होते. परंतु राज्याला व्हॅक्सीन कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे संपूर्ण राज्यात ठिकाणे कमी करण्यात आली. त्यात बुलडाण्यातील तीन केंद्र कमी झाले.