बुलडाणा - येथील नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खलेगाव फाट्या नजिक भीषण अपघात झाला. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातात जीप मधील दोघेजण जागीच ठार झाले तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.
बुलडाण्यात ट्रक-जीपच्या भीषण अपघातात दोन ठार; एक गंभीर
मंगरूळ पीर येथून औरंगाबादकडे निघाली होती तर ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. दरम्यान खलेगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोर समोर धडक झाली.
जखमी चालकाला मेहेकर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त जीप ही भाजीपाला घेऊन मंगरूळ पीर येथून औरंगाबादकडे निघाली होती तर ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. दरम्यान खलेगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोर समोर धडक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की, जीप पूर्ण चक्काचूर झाली आहे. ट्रकचा पुढील भाग सुद्धा क्षतिग्रस्त झाला आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.