महाराष्ट्र

maharashtra

बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून 1 जण ठार; उतरद्यात हरभर्‍याची सुडी भस्मसात

By

Published : Feb 18, 2021, 10:21 PM IST

जिल्ह्यात वीज पडून एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभर्‍याची सुडी पेटून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

rain
पाऊस

बुलडाणा -जिल्ह्यात वीज पडून एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभर्‍याची सुडी पेटून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -बुलडाण्यात कामगारांच्या ठिय्या आंदोलनात जिल्हा उपनिबंधकास धक्काबुक्की; गुन्हा दाखल

बाबुराव भाऊराव रिंढे (वय 60 रा. तांदुळवाडी ता. बुलडाणा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, चिखली तालुक्यातील उतरदा येथे वीज पडून रामेश्वर मनोहर इंगळे यांच्या शेतातील हरभऱ्याची सुडी पेटली आहे. यात इंगळे यांचे अडीच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाने दिली.

गहू, हरभरा, भाजीपाल्यांचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या प्रमाणे वातावरणात बदल होऊन आज पावसाने रिपरिपायला सुरुवात केली. सकाळी 11 ते 1 वाजताच्या सुमारास पावासाने जिल्ह्यातील बुलडाणा, मोताळा, चिखली, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद आदी तालुक्यात हजेरी लावली. पावसामुळे गहू, हरभरा, भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा -बुलडाणा: माजी आमदाराच्या तक्रारीवरून विद्यमान आमदारांवर करता येणार नाही कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details