महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला चाकूने भोसकले - Geeta Jadhav murdered buldana

शहरातील त्रिशरण स्मशानभूमी जवळील जगदंबा नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला पतीने चारित्राच्या संशयावरून चाकूने वार करून ठार केले. ही घटना सोमवारी (9 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता घडली. दरम्यान पत्नीला ठार केल्यानंतर पतीने आपल्या दोन लहान मुलाना घेवून जवळ असलेल्या संगम तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Aug 10, 2021, 1:42 AM IST

बुलडाणा - शहरातील त्रिशरण स्मशानभूमी जवळील जगदंबा नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला पतीने चारित्राच्या संशयावरून चाकूने वार करून ठार केले. ही घटना सोमवारी (9 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता घडली. दरम्यान पत्नीला ठार केल्यानंतर पतीने आपल्या दोन लहान मुलाना घेवून जवळ असलेल्या संगम तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित तरुणांनी तलावात उड्या घेऊन तिघांनाही वाचविले व तलावाबाहेर काढले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -कर्मयोगी शिवशंकरभाऊंना पद्मविभूषण घोषित करावा, शरद पवारांद्वारे पंतप्रधानांकडे मागणी लावून धरणार

पती आला होता पत्नीला घ्यायला-

जालना येथे राहत असलेला गजानन जाधव हा त्याची पत्नी गीता गजानन जाधव यांना बुलडाणा येथे घेण्यासाठी आला. त्याने घरगुती वादात चारित्र्याचा संशय घेतला. यावर पती-पत्नीमध्ये बाचाबाची झाली व नंतर पती गजानन जाधव याने गीताला चाकूने भोसकले.

भोसकल्यानंतर आरोपीने आपल्या लहान मुलांसोबत तलावात घेतली उडी

दरम्यान पत्नीला भोसकल्यानंतर आरोपी गजानन याने आपल्या दोन लहान मुलांना घेवून जवळ असलेल्या संगम तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तलावावर परिसरातील तरुण पोहत होते. त्यानी तलावात उड्या घेऊन तिघांनाही वाचविले व तलावाबाहेर काढले.

आरोपीने केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण-

दरम्यान पती गजानन जाधव हा तात्काळ बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाला. त्याने घडलेला प्रकार पोलिसासमोर सांगितला. गजानन जाधव याला अटक केलेली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details