महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2019, 11:21 PM IST

ETV Bharat / state

खासगी सावकाराच्या गुंडांची शेतकऱ्यांना मारहाण; ६ शेतकऱ्यांसह एक महिला जखमी

सावकाराने अवैधरित्या ताब्यात घेतलेली शेती परत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मेहकर तालुक्यातील बदनापूर येथे घडली. या मारहाणीत ६ शेतकरी व १ महिला शेतकरी गंभीर जखमी झाले आहे.

buldana
जखमी शेतकऱ्यांचे दृश्य

बुलडाणा- सावकाराने अवैधरित्या ताब्यात घेतलेली शेती परत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मेहकर तालुक्यातील बदनापूर येथे घडली. या मारहाणीत ६ शेतकरी व १ महिला शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. जखमी शेतकऱ्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेबाबत माहिती देताना जखमी शेतकरी व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील ठाकरे

सदर हल्ला अवैध सावकाराने केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी केला आहे. बोरकर यांची जमीन अवैध सावकार वामन आनंदा आसोले यांच्या ताब्यात होती. शासनाकडे अवैध सावकारीची तक्रार नोंदविल्यानंतर शासनाने बोरकर यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या नावावर जमिनीचा सातबारा केला. त्यानंतर बोरकर यांनी आपली जमीन सावकाराच्या ताब्यातून घेत त्यात पेरणी सुरू केली. मात्र, पेरणी दरम्यान सावकाराने अचानक ३० ते २५ भाडोत्री गुंड आणून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. गुंडांनी लोखंडी रॉड व लाठ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी केला आहे. सदर प्रकरणाबाबत त्यांनी शहर पोलिसात जबाब दिला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले ४ ते ५ शेतकरी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, शासनाने शेतकऱ्यांकडून निकाल दिल्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी वैजनाथ बोरकर हे मेहकर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप शेतकरी बोरकर यांनी केला आहे. याप्रकरणी रात्री पर्यंत मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळणूक समोर आली आहे. जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केली आहे.

हेही वाचा-स्वस्त धान्य दुकानात गव्हासह तांदळाचा निकृष्ट दर्जा; नागरिकांमध्ये संताप

ABOUT THE AUTHOR

...view details