महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री; तस्करांवर कारवाईची मागणी - sameer khan buldana

खामगावमधील गुटखा तस्करच जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात असा आरोप समीर यांनी केला आहे. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा 2 डिसेंबरला कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

gutkha
गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी

By

Published : Nov 29, 2019, 8:30 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. ही विक्री तत्काळ बंद करुन खामगाव शहरातील मुख्य गुटखा तस्करावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी केली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना यासंबंधीचे निवेदन दिले. कारवाई न झाल्यास स्वतः गुटख्याच्या गोडाऊनवर धाड टाकण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ता समीर खान

हेही वाचा -गुटखा माफियांवर जालना पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा गुटखा जप्त

खामगावमधील गुटखा तस्करच जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात असा आरोप समीर यांनी केला आहे. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा 2 डिसेंबरला कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details