बुलडाणा -जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरु आहे. याकडे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहे. ग्रामीण भागात खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात चालतात.
बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात
बुलडाणा जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरु आहे. वाहतूक पोलीस विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.
हेही वाचा - मलकापुरात उच्चदाब विद्युत प्रवाह वाढल्यामुळे 100 घरातील विद्युत उपकरणें निकामी
जळगाव जामोद तालुक्यात प्रवांशांनी खचाखच भरेलेली वाहने सर्रास पहायला मिळतात. लोकांच्या जीवाशी खेळत प्रवासी वाहतूक करणारे आपला व्यवसाय करत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने अनेकदा अपघाताच्या घटनाही घडतात. वाहतूक पोलीस विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे संपूर्ण जिल्ह्याच्या वाहतूक सुरक्षेचे काम आहे, ते कधीही जिल्ह्यात फिरकत नाहीत.