बुलडाणा- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बाजार पेठेत ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी दोन मीटर अंतरावर दुकानांसमोर रंगाने दर्शनी चौकटी आखल्या आहेत. शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्यधिकारी महेश वाघमोडे यांनी पथकासह बाजार पेठत जावून पाहणी केली. जे नागरिक मास्क किंवा रुमाल बांधून बाजारात येणार नाहीत. त्यांना बाजारात प्रवेश मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. याची तपासणी करण्यासाठी त्यांनी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
..तर बुलडाण्यातील बाजारात प्रवेश बंद हेही वाचा-चिंताजनक..! केरळ, महाराष्ट्रासह तेलंगाणात कोरोनाचे 77 नवे रुग्ण
कोरोनाची लागण होवू नये यासाठी खबरदारी म्हणून सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. मात्र, बाजारत ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे खबरदारी म्हणून बाजारातील दुकानासमोर चुन्याचा रंग करुन दोन मीटर अंतरावर चौकटी आखल्या आहेत. ग्राहकांनी त्या चौकटीत उभे राहून दुकानासमोर रांग लावायची आहे. यामुळे बाजारातील गर्दी कमी होण्यास मदत होत आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी बाजार पेठेत जाऊन पाहणी केली. बाजारात आलेल्या ग्राहकांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल लावणे गरजेच आहे. त्यामुळे बाजाराच्या प्रवेशद्वारावर नागरिकांची तपासणी केली जाईल. यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासोबत बाजाराचा औषध फवारणी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.