महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Extortion Case Buldana: खंडणी मागण्यासाठी यू-ट्यूबवरून शोधून काढली युक्ती नातेवाईकच निघाला खंडणीबाज - दिल्ली येथील गँगस्टरच्या नावाने चाळीस लाखाची खंडणी

बुलडाणा जिल्ह्यात दिल्ली येथील गँगस्टरच्या नावाने चाळीस लाखाची खंडणी मागणारा युवक हा बुलडाण्यातीलच फिर्यादीचा नातेवाईक निघाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. बनावट गँगस्टर बनून या युवकाने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या नातेवाईकांकडे तब्बल ४० लाखाची खंडणी मागितली होती. दिल्लीतील बवाना नामक एका गँगस्टरच्या बाबत युट्यूब वरून माहिती घेऊन त्याच पद्धतीने आरोपीने हे कृत्य केले.

Extortion Case Buldana
आरोपीला अटक

By

Published : Jul 13, 2023, 5:58 PM IST

खंडणी मागणाऱ्या आरोपीला कशी अटक केली याविषयी माहिती सांगताना पोलीस अधिकारी

बुलडाणा :आरोपीने व्हाट्सअपवर ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून देखील या युवकाने आपल्या मित्राच्या साहय्याने ही खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत या युवकाला त्याच्या मित्रासह अटक केली आहे. दिल्ली येथील गॅंगस्टर थेट बुलडाणा येथील एकाला खंडणी मागतो. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. मात्र या पोलीस कारवाईनंतर शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

काय घडला घटनाक्रम -बुलडाणा शहरातील केशवनगर भागात वास्तव्यास असलेले 'म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर' पंकज अरुण खर्चे (वय 42 वर्षे) यांच्या मोबाईलवर ८ जुलैच्या सायंकाळी ५.३५ वाजताच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. मला तुझी सगळी कुंडली माहीत आहे. मला ४० लाख रुपये दे. तू जर पैसे दिले नाही, तर मी तुझा गेम करून टाकीन, अशी धमकी दिली. दरम्यान ९ जुलैच्या सकाळी ६.१५ वाजता दरम्यान त्यांच्या कारचा काच फुटलेला दिसला. तसेच कारजवळ दोन दगडाखाली ठेवलेली एक धमकीची चिठ्ठीही दिसली.

कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी :पंकज खर्चे यांनी चिठ्ठी वाचून पाहिली असता, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा हिंदीत संदेश होता. या प्रकरणी त्यांनी बुलडाणा शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत होते. या प्रकरणाबाबत ठाणेदारांनी संपूर्ण माहिती दिली होती.

गुन्ह्यासाठी डिजिटल मार्गाची निवड :या घटनेमध्ये आरोपींनी यु-ट्यूब या डिजिटल माध्यमाचा धमकी देण्याकरता वापर केल्याचे सांगितले. आरोपींमध्ये आदित्य कोलते हा आरोपी पंकज खर्चे यांचा मावस पुतण्या आहे. तर दुसरा मित्र ऋषिकेश शिंदे याला सहआरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. एकंदरीत या हाय-प्रोफाईल धमकी प्रकरणात आरोपींनी डिजिटल मार्गाची साथ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले असून त्यांनी गुन्ह्यांत वापरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी यु-ट्यूबवरून गुन्ह्यांची कार्यपध्दती जाणून घेऊन त्याप्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल केले.

हेही वाचा:

  1. Illegal Liquor Traffic Caught: विदेशी मद्याची अवैध वाहतूक करून पळाला; पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुसक्या
  2. Thane Crime News : कॉलगर्लचा नाद जीवावर बेतला, ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या; वाचा काय आहे प्रकरण
  3. Chain Theft : सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल आरोपीला पोलिसांनी आणले फरफटत

ABOUT THE AUTHOR

...view details