महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या.. आरोपी पतीचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण - बुलडाणा गुन्हे वृत्त

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात बुधवारी 19 में रोजी पतीने आपल्या पत्नीला उशीने तोंड दाबून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पती हा गुरुवारी 20 मे च्या मध्यरात्री शेगांव शहर पोलीस ठाण्यात हजर झाला व आपण पत्नीला ठार केल्याचे सांगून आत्मसमर्पण केले.

Husband murder his wife in Buldana
Husband murder his wife in Buldana

By

Published : May 21, 2021, 3:10 PM IST

Updated : May 21, 2021, 3:34 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव शहरात बुधवारी 19 में रोजी पतीने आपल्या पत्नीला उशीने तोंड दाबून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पती हा गुरुवारी 20 मे च्या मध्यरात्री शेगाव शहर पोलीस ठाण्यात हजर झाला व आपण पत्नीला ठार केल्याचे सांगून आत्मसमर्पण केले. संजीवनी आढाव असे मृत पत्नीचे नाव असून आरोपी पतीचे नाव कैलास आढाव असे आहे.

बुलडाण्यात पतीकडून पत्नीची हत्या
चार वर्षांपूर्वी कैलास व संजीवनी यांचा झाला होता प्रेमविवाह -
काकनवाडा तालुका संग्रामपूर येथील कैलास आढाव यांचे ४ वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील कावसा येथील संजीवनी आढाव हिच्याशी प्रेमविवाह झालेला होता. मात्र प्रेमाचा रंग फार दिवस टिकून राहिला नाही. काही दिवसातच दोघांमध्ये वाद व्हायला लागले व हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. यानंतर पोलिसांनी दोघांमध्ये आपापसात समेट घडविले. यानंतर पती-पत्नी हे बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात भाड्याने राहायला आले. मात्र संजीवनी आढाव हिला पतीसह सासरकडील मंडळीचाही खूप त्रास होता. यामधून पती शिवाजी आढाव हे मारहाण करत असल्याचा आरोप मृत संजीवनी हिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे पर्यावसान पतीने पत्नीचा उशीच्या साह्याने तोंड दाबून ठार करण्यात झाले. हत्या केल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शिवाजी आढाव हा शेगाव शहर पोलिसात दाखल झाला व आपण आपल्या पत्नीला ठार केल्याचे सांगून आत्मसमर्पण केले. प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृत संजीवनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व आरोपी पती कैलास आढाव याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Last Updated : May 21, 2021, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details