महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा: पती-पत्नीत भांडण, रागाच्या भरात पती चढला टॉवरवर - बुलडाणा पती पत्नीत वाद बातमी

येथे पत्नीबरोबर भांडण झाल्याने पती बीएसएनएलच्या शंभर मीटरपेक्षा उंच टॉवरवर चढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर व्यक्तीला खाली उतरण्याचे आवाहन करण्यात आले. गजानन रोकडे असे या व्यक्तीचे नाव आहे तर, पत्नीचे नाव अनिता गजानन रोकडे असे आहे.

पती-पत्नीत भांडण
पती-पत्नीत भांडण

By

Published : Jul 10, 2020, 7:33 PM IST

बुलडाणा : येथे पत्नीबरोबर भांडण झाल्याने पती बीएसएनएलच्या शंभर मीटरपेक्षा उंच टॉवरवर चढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर व्यक्तीला खाली उतरण्याचे आवाहन करण्यात आले. गजानन रोकडे असे या व्यक्तीचे नाव आहे तर, पत्नीचे नाव अनिता गजानन रोकडे असे आहे.

जिल्ह्यातील सव या गावातील गजानन रोकडे याचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्याने तो रागाच्या भरात बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. त्याने सासरकडील व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी हा प्रयोग केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे त्यानें आपल्या पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्डखाली फेकले. या व्यक्तीच्या कुटुंबातील आई आणि मुलेदेखील घटनास्थळी आणण्यात आले असून पत्नीलादेखील आणण्यात येत आहे. गजाना रोकडे याला खाली बोलावण्यासाठी आता शासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details