महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Buldhana Crime: कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून; नांद्राकोळी येथील धक्कादायक घटना - Rural Police Station

Buldhana Crime: जिल्ह्यात सातत्याने ग्रामीण भागातील महिला दारूबंदीसाठी अग्रेसर असतानाही, याकडे सातत्याने प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन त्याला आहारी गेलेल्या पुरुषांकडून अशा Buldhana Crime अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडल्यानंतरच प्रशासन कारवाई केली जाईल का ? अशा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे

Buldhana Crime
Buldhana Crime

By

Published : Dec 10, 2022, 1:03 PM IST

बुलढाणा:कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कोळपणीची पास मारून खून केल्याची धक्कादायक घटना ग्रामीण पोलीस स्टेशन Rural Police Station अंतर्गत येत असलेल्या नांद्राकोळी येथे रात्री घडली. सुनिता गणेश जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील रहिवासी असलेला गणेश भागाची जाधव हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. याच व्यसनातून पत्नी सोबत त्याची नेहमी खटके उडायचे, असाच वाद दोघांमध्ये काल झाला होता.

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून

रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू: या वादातून आरोपी गणेश भागाजी जाधव यांनी कोळपणी करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी पासने बायकोच्या डोक्यावर वार केले आहे. यात प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी आरोपी गणेश जाधव या ताब्यात घेतले आहे.

खुनाचा गुन्हा दाखल: महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी मुलाने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गजानन शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details