बुलढाणा: राज्यात सुरू असलेल्या बारावीच्या परिक्षेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परिक्षेत आज गणिताचा पेपर होता. मात्र, हा पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातून हा प्रकार समोर आला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर बाहेर पडल्यामुळे परीक्षा राबवणाऱ्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह: गणित पेपर परीक्षेपूर्वीच फुटला त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. हा पेपर कोणी कसा फोडला यामागे कोणाचा हात आहे याची तपासणी केली जात आहे. याबाबत अधिकृत कोणी बोलायला तयार नसले तरी याबाबतचा खुलासा शिक्षण विभागाकडून करण्यात आल्यानंतर या प्रकारात बद्दलची सत्यता समोर येईल. यापूर्वी इंग्रजीच्या पेपरामध्ये उत्तर पेपरात छापण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता गणिताच्या पेपरात हा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे.
अलीकडील काही प्रकरणे: राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षेला सुरूवात झाली आहे. मात्र यंदाच्या बारावी परीक्षेसंदर्भातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बारावीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाच्या ऐवजी उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता तसेच हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचेही पुढे आले होते. तर दुसरीकडे इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे असतानाही बुलडाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज परिक्षेआधीच गणिताचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कॉपीमुक्त अभियानाचे काय?: एकीकडे कॉपीमुक्त परीक्षेकडे राज्य शासन भर देत असताना अनेक प्रकरणे समोर येत आहेत. गणितासारख्या आणि तोही बारावीच्या महत्त्वाचा विषय मध्ये पेपर सुरू व्हायच्या अर्धा तास आधीच पेपर व्हायरल फोटो सोशल मीडियावर आल्यामुळे शिक्षण विभागाचे भोंगळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकंदरीत आता नेमके हे प्रकरणाबाबत शिक्षण विभाग आणि शिक्षण बोर्ड काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: heating Gang Arrested: बच्चन, सचिन, धोनीच्या नावावर फसवणूक करणारी गॅंग गजाआड.. बनवायचे बनावट कागदपत्रे