बुलढाणा :गेल्या काळात कोरोनाचा फटका बसल्याने कोरोनाचे निर्बंध होते. अपेक्षेप्रमाणे सैलानी यात्रा भरलेली नव्हती. मात्र यंदा सैलानी यात्रे जवळपास पाच लाखापेक्षा अधिक भाविक घेण्याची शक्यता आहे. यंदा भरगच्च यात्रा भरणार असून, भाविक यायला सुरुवात झाली आहे. यावर्षी दर्ग्याच्या वरील भागाकडे परंपरेनुसार लाखो नारळांची होळी पेटविली जाणार आहे. या होळीभोवती भाविक लाखोंच्या संख्येने प्रदक्षिणा घालून दर्शन घेतील. तर होळीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
Holi 2023: सैलानीत आज पेटणार लाखो नारळांची होळी, तब्बल तीन वर्षानंतर भरणार यात्रा
जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि सर्व धर्मांची आस्था आणि श्रद्धेचे ठिकाण सोबतच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे. भाविकांची पावले सैलानी यात्रेच्या दिशेने पडत आहे. यंदाही परंपरेनुसार लाखो नारळांची होळी पेटवली जाणार आहे.
असे आहेत बसेसचे मार्ग: या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पोलीस विभाग कामाला लागले आहे. यात्रेत वाहतुकीची होणारी कोंडी पाहता एसटी महामंडळाने सैलानी दर्गाच्या बाजूने पिंपळगाव सराई भडगाव रस्त्यावर मराठवाड्यातून येणाऱ्या बसेससाठी, ढासाळवाडी सैलानी रस्त्यावर बुलढाणा विभागासाठी तर पिंपळगाव सराई सैलानी रस्त्यावर चिखली आगाराच्या बसेस थांबवण्यासाठी साेय केली आहे. सैलानी यात्रेमध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्याची बाबा ट्रस्टच्या वतीने पाण्याचे टँकर लावण्यात आले आहेत. खासगी विहिरीवरून भाविकांसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. सैलानी यात्रेसाठी आरोग्य विभागाच्यावतीने २७ वैद्यकीय अधिकारी, १५ आरोग्य सहाय्यक, २८ आरोग्य सेवक व २७ आरोग्य सेविका आणि ९ रुग्णवाहिकांची तसेच ऑक्सिजन सिलेंडरचा व्यवस्था करण्यात आली असल्याचे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर तायडे यांनी स्पष्ट केले आहे.
सैलानी यात्रेवर कोरोनाचे सावट: १२ मार्चला पिंपळगाव सराई येथून संदल निघून सैलानी येथे चादर चढून व संदल लेप लावण्यात येतो. मागील चार दिवसांमध्ये जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने प्रशासन अलर्ट आहे. अजून जवळपास शंभर पेक्षा जास्ती आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तीन वर्षानंतर होणाऱ्या प्रसिद्ध सैलानी यात्रेवर कोरोनाचे सावटचे ढग गडद होताना दिसत आहे. पण अद्याप प्रशासनाच्या वतीने कोणतेही निर्बंध न लावल्याने या यात्रेकरीता कोणतेच निर्बंध अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत
हेही वाचा: Holi 2023 होलिका दहनच्या दिवशी भद्राकाळला आहे वेगळे महत्व जाणून घ्या इतर राज्यात कधी आहे होळीचे दहन