बुलडाणा -मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही मार्ग दळणवळणासाठी बंद झाले आहेत.
बुलडाण्यात मुसळधार पाऊस सुरुच; नदी-नाल्यांना पूर, मुख्य मार्ग बंद
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच नदी, नाले तुडुंब भरल्याने काही मार्ग बंद झाले आहेत.
जिल्ह्यात बुधवारीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाची ही संततधार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे बुलडाणा-धाड, बुलडाणा-अजिंठा आणि बुलडाणा-चिखली या मार्गावरील नदीला पूर आल्यामुळे हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे धरण भरायला सुरुवात झाली आहे. या अगोदरच जिल्ह्यातील येळगाव, पेनटाकळीसह ५ मोठी धरणे भरलेली आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हेही वाचा -भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, हजारो कार्यकर्ते तुरुंगात जायला तयार - नवाब मलिक