महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात अतिवृष्टीने शेतातील माती गेली वाहून.. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश - नुकसानीचे सर्वेशन करण्याचे निर्देश, खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रशासनला दिले

गेल्या काही दिवसापासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जोरदार पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पावसाच्या पाण्याने खरडून गेल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रशासनला दिले आहेत.

पुरामुळे झालेल्या नुकसानाचे छायाचित्र

By

Published : Jul 1, 2019, 7:06 PM IST

बुलडाणा- गेल्या काही दिवसापासुन चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरडुन गेल्या. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेशन करण्याचे निर्देश, खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रशासनला दिले आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानावर प्रतिक्रिया देतांना बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव व शेतकरी सुभाष तायडे आणि एकनाथ तायडे


गेल्या तीन-चार दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी अनेक शेतात आणि घरांमध्ये शिरले असून त्यामुळे मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना व नागरिकांना नुकसान सोसावे लागले आहे. पुरामुळे शेतातील काळी माती वाहून गेली असून शेतात अक्षरश: दगड रेती वाहून आली आहे. या पावसाने शेकडो एकर जमिनीवरील माती वाहून गेली आहे.


या पार्श्वभूमीवर खासदार प्रतापराव जाधव यांनी ३० जूनला अतिवृष्टी झालेल्या बुलडाणा तालुक्यातील अंभोडा, कोलवड हतेडी या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी या भागात झाल्याने नुकसानीची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना केद्रबिंदू मानून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जालीधर बुधवत, तहसीलदार संतोष शिदे, तालुका कृषी अधिकारी श्री. चोपडे, मंडळ अधिकारी, तलाठी हे शेत-शिवाराची पाहणी करताना त्यांच्यासोबत उपस्थित होते.


या घटनेमुळे निर्सग एका हाताने देत असून दुसऱ्या हाताने काढून घेत असल्याचा प्रत्यय पावसाची वाट पाहत बसलेल्या बुलडाणा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आला आहे. या पावसात त्यांच्या शेतजमिनी वाळवंट झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details