महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात साडेतीन लाखांचा गुटखा जप्त - पानमसाला जप्त

शहरातील बाबु लॉज चौक परिसरातील गुटखा गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी 3 लाख 64 हजार 42 रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे.

बुलडाण्यात गुटखा जप्त

By

Published : Sep 17, 2019, 8:46 PM IST

बुलडाणा - शहरातील बाबु लॉज चौक परिसरातील गुटखा गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी 3 लाख 64 हजार 42 रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

बुलडाण्यात साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

हेही वाचा - वेतनवाढीच्या मागणीसाठी 'आशा वर्कर' व 'गटप्रवर्तक' महिलांचे आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी 17 सप्टेंबरच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना चिखली शहरातील बाबु लॉज चौक परिसरात असलेल्या निसार हाजी गोडाऊनमध्ये गुटका व पान मसाला असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन बुलडाणा पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकला असता, विविध कंपन्यांचा गुटखा जप्त करून अन्न व औाषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा - मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्षाच्या पुत्राचा बँकेत राडा; घटना CCTV मध्ये कैद

या प्रकरणी चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाहीमध्ये स्थानिक गुन्हा शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. आर. इंगळे, प्रकाश राठोड, संजय नागवे, संदिप मोरे, विजय सोनोने, भारतसिंग राजपुत, रवि भिसे यांनी सहभाग घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details