बुलडाणा- रविवारी बुलडाण्यातील एका 45 वर्षीय मृत रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन याबाबत काय महत्वाच्या उपाययोजना करित आहे, याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज 30 मार्चला आपल्या वाढदिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 24 तास घरात राहण्याचे आवाहन नागरिकांना केले.
आज डॉ.शिगणेंचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन करत स्वतः वाढदिवस साजरा केला नाही.
वाढदिवशीच पालकमंत्री शिंगणेंनी घेतली कोरोना आढावा बैठक; बुलडाणा संपूर्ण लॉकडाऊन संपूर्ण बुलडाणा शहर लॉकडाऊन करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहणाऱ्या परिसराला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील 50 नागरिकांना येथील स्त्री रुग्णालयामध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी 24 नागरिकांना आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहेत. रेड झोन परिसरात नगर परिषदेच्या साहाय्याने 40 आरोग्य पथक स्थापन करून परिसरातील परिवारांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
वाढदिवशीच पालकमंत्री शिंगणेंनी घेतली कोरोना आढावा बैठक; बुलडाणा संपूर्ण लॉकडाऊन शिंगणेंनी घेतलेल्या बैठकीला यावेळी जिल्हाधिकारी सुमानचंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, निवासी उपजिल्हाधिकारी गिरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बिल्हाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.