बुलडाणा- गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात वीरमरण आलेल्या जिल्ह्यातील २ जवानांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री मदन येरावर यांनी शुक्रवारी भेट घेतली. मेहकर येथील हुतात्मा राजू गायकवाड आणि आळंद येथील हुतात्मा सर्जेराव खार्डे यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले.
पालकमंत्री मदन येरावारांनी घेतली हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची भेट - मदन येरावर
झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र, तरीही या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागणार आहे. हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री येरावार यांनी सुरुवातीला मेहकर येथे हुतात्मा राजू गायकवाड यांच्या घरी भेट दिली. यावेळी पालकमंत्री यांनी वीरपिता नारायण गायकवाड , वीरमाता आसराबाई गायकवाड, वीरपत्नी भारती गायकवाड यांची विचारपूस केली आणि त्यांचे सांत्वन केले. झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र, तरीही या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागणार आहे. हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
आळंद येथील हुतात्मा पोलीस जवान सर्जेराव ऊर्फ संदीप खार्डे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांच्याशी चर्चा केली. तसेच कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी आमदार डॉ. संजय रायमूलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, धृपदराव सावळे, डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद नलावडे, आदी उपस्थित होते.