महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gulabrao Patil Missing Poster : ऐका हो ऐका! गुलाबराव पाटलांना शोधणाऱ्यास 51 रुपयांचे बक्षीस; बेपत्ता झाल्याचे पोस्टर झळकले - बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील

बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री पद मिळाल्यापासून ते जिल्ह्यात फक्त 2 वेळा येऊन गेले. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास 51 रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले गेले. असे पोस्टर लागल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

Gulabrao Patil Missing Poster
पालकमंत्र्यांचे पोस्टर

By

Published : Apr 23, 2023, 7:14 PM IST

पालकमंत्र्यांच्या बेपत्ता असण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया

बुलडाणा: जिल्ह्यातील शेतकरी वर्ग अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्रस्त झाला आहे; मात्र त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय बैठका घेतल्या गेल्या नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चौकाचौकात पालकमंत्री बेपत्ता आणि शोधून आणणाऱ्यास 51 रुपयांचे बक्षीस, असे जाहीर करण्यात आले आहे.


बळीराजा अडचणीत:अवकाळी पावसाने बळीराजा अनेक अडचणींचा सामना करत आहे आणि त्यातच येणाऱ्या पुढील हंगामासाठी पैशांची जुळवाजवळ करण्याकरिता त्याला मोठी कसरत करावी लागणार आहे. यावर्षी त्याच्या हातातोंडाशी आलेला नगदी पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतल्यानंतर आंतरपीक असलेले फळभाज्या देखील मातीमोल झाल्या आहेत. अवकाळीने नगदी पीक हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रोष: शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही. त्यातच तुरीची खरेदी देखील बंद आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्यापही रखडले आहेत. त्याकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ते बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मागील महिना भरापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. हजारो हेक्टर शेतीसह ठिकठिकाणी घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अद्याप शेताच्या बांध्यावर फिरकले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोष व्यक्त केला आहे.

पालकमंत्री का फिरकले नाही? बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमपासून सातत्याने अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अद्याप जिल्ह्यात फिरकले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री गुलाब पाटील हरवले आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर का जात नाहीत, यावर आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. एका मंत्र्यांकडे चार-चार पाच-पाच जिल्ह्याचे पालकत्व असल्याने ही अडचण होत आहे. भाजप शिवसेनेचे आमदार खासदार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे आमदार खासदार सक्षम असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. जेव्हा आम्ही कमी पडू तेव्हा आम्ही पालकमंत्र्यांना बोलावू असेही संजय गायकवाड म्हणाले.

हेही वाचा:Sex Racket Busted : मुलींचे कौमार्य तोडण्यासाठी लाखांचा सौदा; सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details