बुलडाणा -ग्रीन गोल्ड कंपनीचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या होत्या. याबाबत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी कृषी अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. याची दखल घेत चिखली पोलीस ठाण्यात ग्रीन गोल्ड कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीचे गोडाऊन सील करण्यात आले आहे.
ग्रीन गोल्ड कंपनीचे बोगस बियाणे... कंपनीचे गोडाऊन सील - bogus seeds in buldana
शेतकऱ्यांनी पेरलेले ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीन उगवलेच नाही. काही ठिकाणचे बियाणे उगवले, मात्र ते जगले नाही. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित कंपनीविरोधात सोमवारी जिल्हा कृषी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी पेरलेलेग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीन उगवलेच नाही. काही ठिकाणचे बियाणे उगवले, मात्र ते जगले नाही. यासंर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित कंपनीविरोधात सोमवारी जिल्हा कृषी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रात्री उशिरापर्यंत कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे कृषी विभागाने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला असून कंपनीचे गोडाऊन सील करण्यात आले आहे. तसेच ग्रीन गोल्डला राज्यात बंदी घालावी, अशी शिफारस बुलडाणा कृषी विभागाने सरकारकडे केली आहे. या आंदोलनात राणा चंदन, नितीन राजपूत, पवन देशमुख, सैय्यद वसीम, प्रदीप शेळके, शेख रफिक शेख करीम, दत्तात्रय जेऊघाले, ऋषिकेश म्हस्के यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.