महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जात प्रमाणपत्र संबधित मागण्यांसाठी गोर सेना आक्रमक; बुलडाण्यात केला रास्ता रोको - agitation

जात प्रमाणपत्र देत असताना जात प्रमाणपत्र अधिनियम १९६१ नुसार कार्यवाही करावी व २३ नोव्हे. २०१७ चा रक्त नाते संबंधित अधिसुचना रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी गोर बंजारा सेनेच्या वतीने बुलडाणा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गोर सेना

By

Published : Jul 24, 2019, 8:35 AM IST

बुलडाणा- 1-1 प्रवर्गातील घुसखोर, बोगस खोटे जात प्रमाणपत्रधारक यांना प्रतिबंध घालून असे बोगस जात प्रमाणपत्र घेणाऱ्या व देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच जात प्रमाणपत्र देत असताना जात प्रमाणपत्र अधिनियम १९६१ नुसार कार्यवाही करावी आणि २३ नोव्हे २०१७ चा रक्त नाते संबंधित अधिसुचना रद्द करण्यात यावी, या मागण्यांसाठी गोर बंजारा सेनेच्या वतीने बुलडाणा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


गोर सेनेचा रास्ता रोको आंदोलन

गोर सेनेच्या वतीने सोमवारी 20 जुलैला दुपारी स्थानिक त्रिशरण चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलनकरत्यांनी दिला आहे. यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेवून वाहतूक सुरळीत केली. सदर आंदोलनात पोलिसांनी 107 आंदोलनकर्त्यांना समज देऊन सोडून दिले. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व सोनुभाऊ चव्हाण -विभागीय अध्यक्ष, डॉ.विनोद चव्हाण - जिल्हा सचिव, सुभाषआड - जिल्हा उपाध्यक्ष, इश्वर चव्हाण, राजू राठोड तालुका अध्यक्ष अंदन राठोड, गजानन राठोड, सागर राठोड सुनिल चव्हाण यांनी केले. आंदोलनात समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, महिलांच नेतृत्व संगिता राठोड, गंगाबाई जाधव, निर्मलाबाई राठोड, अंजना राठोड, सुनिता पवार, गोदावरी चव्हाण, गिताबाई राठोड, प्रमिलाबाई अमरसिंग राठोड, कोशल्याबाई चव्हाण, अनिता चव्हाण, शरमाबाई चव्हाण, गुंफाबाई जाधव, सुनिता पवार, संगिता चव्हाण, जनाबाई पवार, मिराबाई चव्हाण, शोभाबाई पवार, धृपताबाई पवार, रमणाबाई पवार यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details