बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव शहरात सध्या अंधश्रद्धेचे भूत फिरत असल्याची चर्चा आहे. आजच्या प्रगत जगात विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे भूत, जादुटोणा आणि पिशाच्च विद्या यासारख्या ‘वेडगळ समजुती’ काही प्रमाणात कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. मात्र, आजही अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकसुद्धा भूत, करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय सध्या शेगावात येत आहे.
CCTV : शेगावात दिसले भूत? तर्क-वितर्कांना आला ऊत - viral
सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे कापड आहे. त्याला पाय व मुंडके नसल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. शरीर नसलेला व्यक्ती वेगाने चौकातून जात असताना दिसत आहे.
शहरात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मध्यरात्रीनंतर शहरातील वाटीका चौकातील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये भूत सदृश्य काहीतरी कैद झाले आहे. यामुळे शहरात याची चर्चा सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयाचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा कापड आहे. त्याला पाय व मुंडके नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. शरीर नसलेला व्यक्ती वेगाने चौकातून जात असताना दिसत आहे. हे नेमके काय आहे? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.