बुलडाणा- सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून ही नाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना लूटमार करत त्यांच्याकडून पैसे लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याने पुन्हा एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत पाच जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्यारांसह 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महेश बाळू मोहिते (वय 23), दिलीप शेषराव चव्हाण (वय 23), कृष्णा पुंडलिक चव्हाण (वय 60), बळीराम पुंडलिक चव्हाण (वय 45, रा. दधम) आणि सतिश पवन पवार (वय 19) आणि दुर्जन किसन शिंदे (रा. जयरामगड) यांचा समावेश आहे.
नकली सोन्याची नाणी विकून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुन्हा केले जेरबंद - buldana crime news
यापूर्वी देखील अंत्रज व हिवरखेड पसरीसरात दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी नकली सोन्याची नाणी, देशी कट्टे व इतर हत्यारे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली होती.
नकली सोन्याची नाणी विकून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुन्हा केले जेरबंद
यापूर्वीही दोन कोंबिंग ऑपरेशन करून आरोपी केली होती अटक-
यापूर्वी देखील अंत्रज व हिवरखेड पसरीसरात दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी नकली सोन्याची नाणी, देशी कट्टे व इतर हत्यारे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली होती.
Last Updated : Jun 1, 2021, 9:36 PM IST