महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेढे घ्या, पेढे, अच्छे दिन आले! बुलडाण्यात पेट्रोल दरवाढी विरोधात कॉंग्रेसची गांधीगिरी - petrol Price increase

बुलडाणा शहरात भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलचे दर 101.57 पैसे प्रति लिटरपर्यंत पोहचले आहेत. तर 92.04 पैसे अशी डिझेलची प्रति लिटर किंमत झाली आहे. इंडियन ऑईलच्या पेट्रोलची किंमत प्रति लिटर 101.50 पैसे तर डिझेलचे दर 91.97 पैसे प्रति लिटरचे दर झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात या इंधनदरवाढीमुळे केंद्र सरकारविरुद्ध नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

Gandhigiri movement on petrol Price increase in Buldana
बुलडाण्यात पेढे वाटून गांधीगिरी आंदोलन

By

Published : May 30, 2021, 9:16 AM IST

बुलडाणा - शहरात पेट्रोल शंभरी तर डिझेल 92 रुपये पर्यंत गेले आहेत. याविरोधात बुलडाणा शहर काँग्रेसच्यावतीने शनिवार येथील हिरोळे पेट्रोल पंपासमोर पेढे वाटून दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी पेढे घ्या, पेढे, अच्छे दिन आले! असे म्हणत वाहनधारकांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेर्धात पेढे वाटून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

बुलडाण्यात पेढे वाटून गांधीगिरी आंदोलन

महागाईत सामान्य नागरिक होरपळला -

देशातल्या जनतेला लोकसभा निवडणुकीत भाजपाने अनेक वचन दिले होते. महागाई व इंधनाचे भाव कमी करू असे व "अच्छे दिन आएंगे" आश्वासन देण्यात आले होते. भाजपाकडे केंद्रात एक हाती सत्ता आल्याने देशात जनतेचे भले होईल असे वाटत होते. पण जनतेची घोर निराशा झाल्याची स्थिती आहे. सातत्याने होणारी दरवाढ ही वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार बंद आहेत, कामगारांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदे बुडाले व आता महागाईने कहर केला आहे. शिवाय पेट्रोल-डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाच्या दरवाढीने सामान्य नागरिक होरपळला आहे.

सरकारविरुद्ध नागरिकांमध्ये रोष -

बुलडाणा शहरात भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलचे दर 101.57 पैसे प्रति लिटरपर्यंत पोहचले आहेत. तर 92.04 पैसे अशी डिझेलची प्रति लिटर किंमत झाली आहे. इंडियन ऑईलच्या पेट्रोलची किंमत प्रति लिटर 101.50 पैसे तर डिझेलचे दर 91.97 पैसे प्रति लिटरचे दर झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात या इंधनदरवाढीमुळे केंद्र सरकारविरुद्ध नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

पेढे वाटून गांधीगिरी आंदोलन -

महागाई व इंधनदरवाढीचा विरोध करीत शनिवारी बुलडाणा शहरातील हिरोळे पेट्रोल पंपावर कॉंग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहरात पेट्रोलने शंभरी तर डिझेल 92 रुपये पर्यंत गेल्याने अच्छे दिनाची सुरुवात म्हणत वाहनधारकांना पेढे वाटून गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉंग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकास, जिल्हा सरचिटणीस सुनिल सपकाळ, अ‍ॅड. राज शेख, शे. मुजाहिद, चिंटू परसे,अमीन टेलर यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details