महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर लोणार पोलिसांचा छापा; 15 लाखांच्या मुद्देमालासह 27 जण ताब्यात

सिंदखेडराजा हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणार पोलिसांनी छापा मारून 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 27 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

buldana crime
सिंदखेडराजा हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणार पोलिसांनी छापा मारून 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

By

Published : Jun 19, 2020, 4:00 PM IST

बुलडाणा - सिंदखेडराजा हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणार पोलिसांनी छापा मारून 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 27 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सिंदखेडराजा हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणार पोलिसांनी छापा मारून 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

सिंदखेडराजा येथे बीएसएनल टॉवर जवळ असणाऱया एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यानुसार (गुरुवार) 18 जूनला लोणारचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी संबंधित अड्ड्याचा मागोवा घेतला. मिळालेल्या माहितीवरून छापा टाकत त्यांनी 27 जुगारींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 92 हजार 630 रोख रुपये, 1 लाख 23 हजारांचे 25 मोबाइल, 12 लाख 60 हजार रुपयांच्या 25 मोटारसायकल आणि पत्ते, टेबल-खुर्ची, जुगाराच्या साहित्यासह 13 हजार रुपये जप्त केले. हा मुद्देमाल एकूण 15 लाख 88 हजार 630 रुपयांचा आहेत. संबंधित जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने लोणार ठाणेदारांना या प्रकारची कारवाई करायला लागल्याने सिंदखेडराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सातव यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्ह्यातील वाढत्या जुगारी अड्ड्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अधीक्षक कडक पावलं उचलत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details