बुलडाणा - पंढरपूर ते शेगाव परतीच्या प्रवासाला निघलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी 5 ऑगस्टला, जिल्हयातील रजतनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खामगाव शहरात दाखल झाली. विविध सेवाभावी मंडळांनी या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून पालखीसोबत शेगावला जाणारे भाविकही आतुर झाल्याचे पाहण्यात आले. हा मुक्काम पालखीचा शेवटचा मुक्काम असणार आहे.
गजानन महाराजांची पालखी रजतनगरी खामगावमध्ये दाखल, श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम - खामगाव
आषाढी एकादशीचा उत्सव आटोपून संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतली असून, ५ ऑगस्टला श्रींच्या पालखीचे खामगाव शहरात आगमन झाले. त्यानुषंगाने शहरात सेवाभावी संस्था, नागरिकांची लगबग दिसून आली. ठीक ठिकाणी चहा, फराळ, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
आषाढी एकादशीचा उत्सव आटोपून संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतली असून, ५ ऑगस्टला श्रींच्या पालखीचे खामगाव शहरात आगमन झाले. त्यानुषंगाने शहरात सेवाभावी संस्था, नागरिकांची लगबग दिसून आली. ठीक ठिकाणी चहा, फराळ, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. खामगाव शहर भक्तीमय झाले आहे पालखीदरम्यान खामगाव ते शेगाव मार्गावर सेवा देणारे सेवेकरीही मंगळवारच्या सकाळसाठी सज्ज झाले आहेत.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था सेवाभावी मंडळांकडून करण्यात येणार आहे. आज खामगाव शहरात पालखीचा शेवटचा मुक्काम आहे. श्रींची पालखी ५ ऑगस्टला खामगाव शहरात दाखल झाली असून रात्रभर मुक्कामी राहिल्यानंतर मंगळवारी 6 ऑगस्टला पहाटेच पालखी शेगावकडे मार्गस्थ होईल. पालखीला निरोप देण्याकरिता शहरासह जिल्हयातून लाखो भाविक पालखी सोबत पायी प्रवास करत शेगाव जात असतात. या मार्गात भाविकांना विविध सेवाभावी मंडळाकडून चहा, फराळ, वैद्यकीय तसेच इतर सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.