बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर येथील सीआरपीएफ जवान संजय राजपूत यांना पुलवामा हल्ल्यात वीरमरण आले. प्रशासनाने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या घराजवळील नगरपालिकेच्या मैदानावर शासकीय इतमामात उद्या ४ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शहीद जवानांचे पार्थिव श्रीनगरवरून आज दिल्लीत दाखल झाले आहे. उद्या सकाळपर्यंत नागपूर विमानतळावर पोहोचणार असून उद्या ११ वाजेपर्यंत मलकापूरला पोहोचणार आहे. त्यानंतर अंत्यदर्शन झाल्यावर ४ वाजेपर्यंत अंत्यविधी होणार असल्याची माहिती नातेवाईक आणि प्रशासनाने दिली.
उद्या ४ वाजता संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार - संजय राजपूत
शहीद जवानांचे पार्थिव श्रीनगरवरून आज दिल्लीत दाखल झाले आहे. उद्या सकाळपर्यंत नागपूर विमानतळावर पोहोचणार असून उद्या ११ वाजेपर्यंत मलकापूरला पोहोचणार आहे.
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेले जवान संजय राजपूत