बुलडाणा - ज्याप्रमाणे मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त आपल्या जागी परीक्षेला दुसऱ्यालाच बसवतो आणि तो डॉक्टर होतो. असाच काहीसा प्रकार बुलडाण्याच्या आरोग्य सेवक परीक्षा केंद्रावर उघडकीस आला आहे. दुसऱ्याच्या नावावर परिक्षा देणाऱ्या आरोपी विद्यार्थ्याला रविवारी 12 जानेवारीला दुपारी 2 वाजता केंद्र प्रमुखाने रंगेहाथ पकडले आहे. या आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुध्द बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -अश्लील शिवीगाळ करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी मूक मोर्चा
आरोपी विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी पाठवणाऱ्या बुलडाणा येथील संजय दांडगे यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर ‘मुन्नाभाई’ सापडल्याने आल्याने याची चर्चा सर्वत्र होत आहे. दरम्यान या आरोपीला सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मुन्नाभाईचे नाव चंदन बहुरे असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील राजेवाडी येथील रहिवासी आहे.