बुलडाणा - जामोद येथे सिलेंडरच्या स्फोटात चार घरे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. संतोष कोकाटे यांच्या घरात सिलेंडर लिकेज झाल्याने ही आग लागली. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
सिलेंडरच्या स्फोटात चार घरे जळून खाक
बुलडाण्यातील जामोद येथे सिलेंडरच्या स्फोटात चार घरे जळून खाक झाली.
आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आजूबाजूची तीन घरेसुद्धा यात भस्मसात झाली. आगीत चारही घरांचे मोठे नुकसान झाले असून यात अंदाजे १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत संतोष कोकाटे, गणेश अंबडकार, लक्ष्मण केदार आणि महादेव राऊत यांची घरे जळून खाक झाली.
घरगुती गॅस लिकेजनंतर सिलेंडरमध्ये स्फोट झाला. यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले असावे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अग्निशमन दल, तसेच गावातील टँकरने पाणी आणून ही आग विझवण्यात आली.