बुलडाणा - खामगावातील बड्डे प्लॉट येथे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृतदेह शनिवारी (दि. 30 मे) सायंकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्युत झटका लागून या चौघांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लग्ना आधीच विघ्न..! एकाच कुटुंबातील चौघांचे आढळले मृतदेह, दोघा भावी नवरदेवांचा समावेश - खामगाव शहरातील बर्डे प्लॉट बातमी
बुलडाण्याच्या खामगाव येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील दोघा भावंडांचे पुढील आढवड्यात लग्न होणार होते.
भुरू घासी पटेल (वय 52 वर्षे), साजेदाबी भूरू पटेल (वय 50 वर्षे), जावेद भूरू पटेल (वय 25 वर्षे) आणि जाकीर भूरू पटेल (वय 22 वर्षे), अशी मृतांची नावे आहेत.
खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील पटेल कुटुंबीय हे घरात मृतावस्थेत आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यातील जावेद याचे 7 जून तर जाकिर याचे 8 जून रोजी लग्न होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, ही घटनेतील चौघांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
हेही वाचा -अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रक्तपेढ्या मोजताहेत शेवटच्या घटका