चार दिवसीय कृषी महोत्सवाला सुरूवात बुलढाणा: आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये व्हावा, शेतीमध्ये उत्पादन वाढवे, शेती तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावे या दृष्टिकोनातून बुलढाणा येथे कृषी महोत्सवाचे आयोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हातील शेतकरी आणि महिला गटाने तयार केलेलेया वस्तू, पदार्थ याठीकणी पाहायला मिळणार आहेत. यासाठी जवळपास 200 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. तर विविध तज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहेत.
फूड पार्क संकल्पना: यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करून उत्पादन वाढावे यासाठी येळगाव मध्ये फूडपार्क संकल्पना येणार आहे. भाजीपाला पिके नाशवंत आहेत. त्यावर योग्य वेळी प्रक्रिया करावी लागते. त्या दृष्टीने बुलढाणा शहरा नजीक फूड पार्क सारखी संकल्पना शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून देईल असे आमदार गायकवाड म्हणाले.
जिजामाता स्टेडियमवर महोत्सव सुरू:स्थानिक जिजामाता प्रेक्षक गारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ.एचपी तूम्मोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ.धनंजय उंदीरवाडे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे ,जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे हे यावेळी उपस्थित होते. 10 ते 14 फेब्रुवारीपर्यत बुलढाणा शहरातील जिजामाता स्टेडियमवर हा महोत्सव सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पाठपुराव्यामुळे विम्यापोटी हवी असणारी 9 कोटी 87 लाखांची रक्कम प्राप्त झाली आहे. येत्या काळात 49 हजार शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न निकाली काढण्यात येईल. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास शेतीला चांगले दिवस येतील असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी ही पर्वणी: महोत्सवा दरम्यान सेंद्रिय शेतीचे महत्व, पौष्टिक तृणधान्य स्पर्धा, शेती बांधावर जैविक उत्पादने तयार करणे, शेतीवर करावयाचे मृदा व जलसंधारण तंत्रज्ञान, रेशीम उद्योग, व्यवसाय, संधी आणि बाजारपेठ याविषयी विविध कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सेंद्रिय शेतमालकाची विक्री व प्रदर्शनी, धान्य महोत्सव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल, शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, कृषी अवजाराचे दालन, प्रधानमंत्री सुषमा अन्नप्रक्रिया उद्योग योजना, कृषी संबंधित सर्व योजनांची माहिती या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही पर्वणी ठरणार असून शेतकरी बांधवांनी या महोत्सवामध्ये या कृषी महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असा आवाहन बुलढाणा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी केले आहे.
हेही वाचा: Buldhana News: ग्रामसभेत घेतला अवैध धंदे बंदचा निर्णय; महिला सरपंचानी घेतला पुढाकार...