महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात 44 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; 12 रुग्णांची कोरोनावर मात.. - buldana corona news

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 669 पर्यंत पोहोचली आहे. यापैकी 297 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुलडाण्यात गुरुवारी 44 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.

Buldana corona update
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 17, 2020, 12:46 PM IST

बुलडाणा-जिल्ह्यात कोरोना रुग्णांसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी 44 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 669 पर्यंत पोहोचली आहे. तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 280 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 236 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 16 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 तर रॅपिड टेस्टमधील 233 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे दिवसभरात 236 अहवाल निगेटिव्ह आहेत.

गुरुवारी 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खामगाव येथील 50 व 55 वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.12 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये साखर खर्डा तालुका सिंदखेड राजा येथील 65 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, सिविल कॉलनी (ता. दे. राजा) येथील 30 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, दूर्गापुरा दे. राजा येथील 78, 50, 12 वर्षीय पुरुष, 48 व 13 वर्षीय महिला, जलालपुरा खामगांव येथील 52 वर्षीय पुरुष, सती फैल येथील 85 वर्षीय महिला व डी.एस.डी बुलडाणा येथील 37 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

गुरुवारपर्यंत 5575 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 297 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 41 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 669 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 352 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव येथील 54 व 55 वर्षीय पुरुष, भुसारी गल्लीतील 53 वर्षीय पुरुष, महबुब गल्ली 55 वर्षीय महिला, शंकर नगर 25 वर्षीय महिला, केशव प्लॉट 40 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर 38 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, सिविल लाइन्स 20 व 45 वर्षीय महिला, अग्रसेन चौक 72 वर्षीय पुरुष, यशोदरा नगर 22 वर्षीय पुरुष, भालेगाव 60 वर्षीय पुरुष रुग्ण आढळले आहेत.

देऊळगाव तालुक्यातील राजा जुना जालना रोड येथे 23, 51, 20 व 17 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी 17 व19 वर्षीय महिला,अग्रसेन चौकातील 65 वर्षीय महिला, बालाजी नगर 56 व 26 वर्षीय महिला, दुर्गापुरा 22 वर्षीय महिला, आदर्श कॉलनी 28 वर्षीय पुरुष, जळगाव जामोद 50 वर्षीय महिला, असे कोरोनाबाधित आढळलले आहेत.

शेगाव तालुक्यातील दसरा नगर 38 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय पुरुष, देशमुख पुरा 28 वर्षीय पुरुष, धनगर फैल 12 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बुलडाणा तालुक्यात मुठ्ठे ले आऊट 32 वर्षीय पुरुष, नांदुरा 48 वर्षीय महिला, माळीपुरा 34 वर्षीय पुरुष, वडगाव माळी तालुका मेहकर येथील 45, 40 व 75 वर्षीय महिला, 16, 5 व 48 वर्षीय पुरुष, मलकापूर तालुक्यातील 42 व 38 वर्षीय पुरुष, संत ज्ञानेश्वर नगर 73 वर्षीय महिला, 11 व 16 वर्षीय पुरुष आणि मूळ पत्ता शिपोरा ता भोकरदन जि. जालना येथील 60 वर्षीय महिला यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details