महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदार शिंदेचा शिवसेनेनंतर वंचितलाही रामराम, हाती घेतला भाजपचा झेंडा - बुलडाणा भाजप न्यूज

मातोश्रीशी अतिशय जवळीक असलेले आणि एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे विजयराज शिंदे हे शिवसेनेनेकडून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने विजयराज शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी वंचितमध्ये आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला.

विजयराज शिंदे
विजयराज शिंदे

By

Published : Aug 25, 2020, 7:28 PM IST

Updated : Aug 26, 2020, 12:15 PM IST

बुलडाणा - विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर व भाजप आमदार श्वेता महाले-पाटील, भाजप नेते योगेंद्र गोडे यांची उपस्थित होती. गेल्या विधासभेला शिवसेनेने शिंदे यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता आणि वंचितकडून विधानसभा लढविली होती. यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

माजी आमदार शिंदेचा शिवसेनेनंतर वंचितलाही रामराम, हाती घेतला भाजपचा झेंडा
मातोश्रीशी अतिशय जवळीक असलेले आणि एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे विजयराज शिंदे हे शिवसेनेने कडून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने विजयराज शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. त्यामुळे शिंदे यांनी उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून निवडणूक लढवली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र त्यांना वंचितमध्ये काम करण्याचा फारसा उत्साह कधी दिसून आला नाही. त्यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला.

सुरुवातीला भगवा त्यानंतर निळा आणि आता भाजपचा झेंडा विजयराज शिंदे यांनी हाती घेतला आहे. शिंदेंसोबत प्रवेश शिवसेना माजी जिल्हा प्रमुख महिला आघाडी तथा नगरसेविका सिंधुताई खेडेकर, बाजार समिती संचालक माजी तालुका प्रमुख शिवसेना अर्जुन दांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम नारखेडे, पुरुषोत्तम लखोटीया, माजी उपसभापती पंचायत समिती मोताळा कृष्णा भोरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, माजी नगरसेवक संजय नागवनशी, समाधान राऊत, गणेश पाटील, सागवान सरपंच सौ कांताबाई राजगुरे,सरपंच गुलभेली तुकाराम राठोड,ज्ञानेश्वर राजगुरे, सचिन शेळके, अशोक किंन्होळकर, मो सोफियान जनसेवक, रहीम शाह, हेमंत जाधव, वैभव ठाकरे, राजेश सुरपाटणे, अविनाश शेंडे, सुनील काटेकर यांनीही भाजपात प्रवेश केला.

Last Updated : Aug 26, 2020, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details