बुलडाणा- मागील काही दिवसांपासून अवैध पद्धतीने सागवान लागडाची वाहतूक होत आहे. त्यामुळे वनविभाग सतर्क झाले आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर जळगाव जामोदच्या वनविभाग पथकाने कारवाई केली आहे. यात 20 हजाराचे सागवान आणि एक दुचाकी असा एकूण 26 हजार 510 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ओम फुलचंद सूर्यवंशी (रा. कूवर देव ता.जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागवानाची अवैध वाहतूक... 26 हजारांचा मुद्देमाल जप्त, एकजण फरार - सागवानाची तस्करी बुलडाणा
सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.खान यांच्या पथकाने कुवर देव रोडवर सापळा रचून नाका बंदी केली. यादरम्यान अधिकाऱ्यांना दोन दुचाकी येताना दिसल्या त्यावर सागवानाचे लाकूड होते.
वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.खान यांच्या पथकाने कुवर देव रोडवर सापळारचून नाका बंदी केली. यादरम्यान अधिकाऱ्यांना दोन दुचाकी येताना दिसल्या त्यावर सागवानाचे लाकूड होते. यातील एका दुचाकीस्वाराला पकडण्यात यश आले. मात्र एकजण फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत दोन सागवान नग 6 हजार 510 रुपये. व एक मोटर सायकल 20 हजार रुपये असा एकूण 26 हजार 510 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनरक्षक के.न. सलामे, एम आर.बरेला, खेडकर, उबरहण्डे देवकर, फड, वनरक्षक, मंगेश पाटील, राजू इंगोले यांनी ही कारवाई केली आहे.