बुलडाणा- देशभरात नागरिकत्व सुधार कायद्या विरोधात विविध आंदोलने सुरू आहेत. शहरात देखील २० किलोमीटरचा पायदळ मोर्चा काढून या कायद्याला विरोध दर्शविण्यात आला आहे. मोताळा ते बुलडाणा दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.
नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात पायी मोर्चा; २० किलोमीटर चालून नोंदवला निषेध - सीएए विरोध बुलडाणा
या सर्वपक्षीय मोर्चाची मोताळाहून सुरुवात झाली. मोर्चा वाघजाळ, राजूर होत शहरातील शाहीन बाग येथे पोहोचला. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मोर्चाची दृश्ये
या सर्वपक्षीय मोर्चाची मोताळाहून सुरूवात झाली. मोर्चा वाघजाळ, राजूर होत शहरातील शाहीन बाग येथे पोहचला. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक बांधव सहभागी झाले होते. २० किलोमीटरच्या अंतरावर मोर्चेकऱ्यांसाठी विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा-महाशिवरात्रीनिमित्त बनवला ९ क्विंटल वजनाचा महारोठ, प्रसादासाठी भाविकांची गर्दी