बुलडाणा - जगभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलडाणा जिल्ह्यात 17 तर शेगावमध्ये 3 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुढील उपचाराच्या दृष्टिकोनातून शेगावच्या श्री. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने विसावा भक्तनिवास संकुल येथे रुग्णांसाठी ५ वार्डात ५०० बेडचे सुसज्ज क्वारंटाईन युनिट तयार करण्यात आले आहेत.
श्री संत गजानन महाराज संस्थेकडून पाचशे बेडचे क्वारंटाईन युनिट तयार - buldhana
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भविष्यात शासकीय रुग्णालय कमी पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाच्या दृष्टीने शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने विसावा भक्तनिवास संकुल येथील रुग्णांसाठी ५ वार्डात ५०० बेडचे सुसज्ज क्वारंटाईन युनिट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्यात येणार आहे.
संपादीत छायाचित्र